Pudina
https://cdn.shpy.in/27189/1638886625028_SKU-4596_0.jpg?width=1200

Pudina

₹ 10

₹ 15

33%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 1 points from this product


Add to Wishlist


पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे लँटिन नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे लँटिन कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचकवातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादि याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव पडतो. आतड्यांचे रोगातही हा उपकारक आहे.तुळशीच्या पानासारखेच, विषारी कीडा चावल्याच्या जागी हिची पाने चोळल्यास, कीडा चावल्यामुळे होणारी आग व कंड कमी होतो.या वनस्पतीचा स्वयंपाकातही वापर होतो.पाणीपुरी, कैरीची चटणी, जलजीरा आदींमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे.स्वयंपाकातील अन्य पदार्थांसाठीही याचा वापर होतो.भारतात, उन्हाळ्यात याचा वापर जास्त करण्यात येतो.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers