Bhendi
https://cdn.shpy.in/27189/1639333837358_SKU-4688_0.jpg?width=1200

Bhendi

₹ 40

₹ 45

11%


Maximum Order Quantity is 3 pcs

You will earn 4 points from this product


Add to Wishlist


एक फळभाजी भेंडी ही वर्षायू वनस्पती माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अबेलमोशस एस्कुलेंटस  आहे. कापूस व जास्वंद या वनस्पतीदेखील या कुलात येतात. भेंडी मूळची आफ्रिकेतील असून जगातील सर्व उष्ण प्रदेशांत भाजीसाठी तिची लागवड  केली जाते.

भेंडीचे झुडूप १–२·५ मी. उंच वाढत असून त्याच्या खोडावर केस असतात. पाने साधी, एकाआड एक, हृदयाकृती, ३–५ अल्पखंडित असतात. फुले मोठी, पिवळी, नरसाळ्याच्या आकाराची व द्विलिंगी असून पानांच्या बगलेत येतात. फुलांच्या मध्यभागी लाल किंवा जांभळा ठिपका असतो. याचे फळ लांबट, शेंगेसारखे आणि हिरवे किंवा पिवळट असून त्यावर ५–८ शिरा असतात. बिया अनेक, गोलसर व रेषांकित असतात. फळ वाळले की शिरांवर तडकते. कच्च्या फळात भरपूर श्‍लेष्मल पदार्थ असतो. फळात ८८% पाणी, २% प्रथिने, ८% कर्बोदके तसेच लोह, कॅल्शियम, आणि जीवनसत्त्वे असतात.


Share On


Reviews and Ratings

No Customer Reviews

Share your thoughts with other customers